STORYMIRROR

Manali Pamale

Others

3  

Manali Pamale

Others

रवंथ

रवंथ

1 min
681

रस्त्याच्या कडेला धड फैलून बसली होती गाय

तोंडात चघळत होती जणू दुधावरची साय

म्हटला चला विचारू हिला खातेय तरी काय?

शेटाणीसारखी बसून काय करतेय गं माझी माय?


ती हंबरली.. जरा गुरगुरली.. पाहून माझ्याकडे जरा हसली..

पाहा ह्या अडाणी पोरीला, अशी कशी ही फसली?

आम्ही करतो रवंथ हे शाळेत नाही का शिकली?


मी वरमले.. शरमिंदा झाले.. पडल्या आवाजात बोलले..

माफ कर गं गोमाते खरंच मी विसरले..

तिसरी चौथीतल्या गोष्टी कशाला लक्षात ठेऊ?

शिकतेय मोठी डाॅक्टरकीची बुकं मग इथं कुठं ध्यान देऊ?


गाय म्हणाली जाऊ दे गं पोरी.. सांगते मी तुला समजावून..

समोर असतं एवढ्यालं रान, म्हणून घेतो आम्ही चराचरा खाऊन..

गोठ्यात परतल्यानंतर मग निवांत वेळ मिळतो..

तेव्हा मग लुसलुशीत चाऱ्याची चव घेण्याचा मोह दटावतो..

खाल्लेला चारा पुन्हा ह्याच आेठी रेंगाळतो..

काही तास मग तिथ्थेच वरखाली फिरतो..

आणि बाळा ह्यालाच आपण रवंथ असे नाव देतो..


होय गं गाई...

बरोब्बर बोललीस तू..

विसरून गेली होती मी पार..

पण नेमका आता जुळला तंतू..

हेच नेमकं करायला विसरली बघ मी..

रवंथ.. विचारांचा.. जुन्या गोष्टींचा..


मोठी होत गेले तसं होत गेलं मागलं सपाट..

मूळ व्याख्या विसरून भरू लागले पायाविना कपाट..

कसल्या आधारावर तग धरेल हे लक्षातच नाही आलं..

विस्कटणार तर नाही हे भ्या मात्र सारखं वाटत राहिलं..


वाटलं जाडीभरडी बुकं शिकून मी रग्गड हुश्शार झाले..

तरीही कच्च्या राहिलेल्या सिमेंटपायी आभाळी भिडू पाहणारे कळस डगमगले..

पण....

तुझ्यामुळंच आज मला ते कारण कळून चुकले..

नि मग उभं आयुष्य मनी रवंथ करण्यावाचून दुसरा चारा नाही हे पक्के उमगले..


Rate this content
Log in

More marathi poem from Manali Pamale