राजा शिवछत्रपती
राजा शिवछत्रपती
1 min
189
जिजाउंपोटी येऊन जन्माला देव
स्वराज्यात आनंद लागला दिसू।
घेऊन सुटकेचा श्वास सह्याद्रीन
किर्रर्र डोंगरदर्यातून लागली हसू
🚩......!! १ !!.....🚩
कुशाग्र बुद्धिमतेची छाप पाडुनी
झाली जगी अजरामर कीर्ती ।
राज तुमच्या पायानं पदपावंन झाली खरंच महाराष्ट्राची धरती
🚩...... !! २ !!.......🚩
जिंकूनी पहिला गड तोरणा तुम्ही
बांधलं। स्वराज्याच तोरण ।
सुरक्षित राहिली पाहिजे सर्वत्र
महिला हेच मुख्य तुमचं धोरण
🚩......!! ३ !!.....🚩
शपथ घेतली अवघ्या १६व्या वर्षी
बारा मावळातील सवंगड्यासह
रयतेच्या रक्षणार्थ २३किल्ले देऊन केला पुरंदरचा तह
🚩......!! ४ !!.....🚩
आदिल निजामीचा एकएक शिपाई पुरता तेव्हाच भ्याला
चित्तथरारक तो गिळंकृत प्रसंग
प्रतापगडावरती झाला ।।।
प्रतापगडावरती झाला।।।
🚩......!! ५ !!.....🚩
