पुढला जन्म मला पक्षाचाच मिळावा
पुढला जन्म मला पक्षाचाच मिळावा
मलाही नेहमीच वाटत की पक्षांसारख जगावं,
पंख फडफडवत उंच नभी उडावं.
कित्ती देश फिरलो असतो, कुठे कुठे मी गेलो असतो,
अहो, युरोपच काय तर पृथ्वीप्रदक्षिणाच घालून आलो असतो.
जरा का वाढला असता इथे गरमा, तर गेलो असतो कि स्वीत्झर्लंडला,
आणि, येताना आलो असतो पाय लाऊन स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला.
आयफेल टॉवर राहिला नसता कि इजिप्तचा पिरॅमिड सोडला नसता,
थेमस आणि नाईल शिवाय पाण्याचा थेंब घशात घेतला नसता.
गंगेमध्ये जाऊन रोज अंघोळ मी केली असती,
चीनच्या भिंतीवर बसून मजेत पाठ शेकावली असती.
पेरू खायला गेलो असतो खरोखरच्या पेरूला,
तिखटासाठी गेलो असतो बाजूच्याच चिलीला.
केली असती पक्षिणीशी गुटर्गू अन गेलो असतो ताज-महाल दाखवायला,
अहो शीळ घालत घालत नेलं असतं आफ्रिका खंड फिरवायला .
नसतो हो त्यांना तिकिटाचा खर्च वा विजाची कटकट,
काय करणार, नशीबच आमच, हा माणसाचा जन्म मिळाला.
या पुढला जन्म तरी देवा मला पक्षाचाच मिळावा,
या पुढला जन्म तरी देवा मला पक्षाचाच मिळावा !!