- पर्यावरणाचे संरक्षण -
- पर्यावरणाचे संरक्षण -
1 min
249
झाडे जगवा झाडे वाढवा
करून रक्षण पर्यावरणाचे
वृक्षसंवर्धन करूया
रक्षण करण्या सजिवांचे ...१
वसुंधरेचे संरक्षण
करूया प्राणपणाने
जपूया पृथ्वीला
जीवाच्या आकांताने .....२
झाडे देती स्वच्छ हवा
सावली फळे फुले
राखता त्यांची निगा
चराचरातील चैतन्य खुले .....३
कसली न कमतरता
येई सजीवा जीवनी
प्रत्येकास खुल्या श्वासा
मिळेल संजीवनी .....४
वृक्षतोडीने बिघडे संतुलन
रोगराईस मिळे आव्हान
जाग येऊ दे तुला मनुजा
ठेव पर्यावरणाचा मान .....५
झाडे लावुया जगवूया
सारे घेऊ एकच ध्यास
पर्यावरणाचे संवर्धन
भविष्याचा अंतिम श्वास ....६
