पर्यावरण संवर्धन काळाची गरज
पर्यावरण संवर्धन काळाची गरज
1 min
1.1K
प्रत्येकाने एक तरी लावू झाड
अशीच शपथ आपण घेऊ
आजच रोखू पर्यावरण हानी
उद्याचे भविष्य उज्ज्वल पाहू
नदीपात्रातली रोखूनी
वाळू, माती उपसा
येणार्या महापुरापासूनी
नाश थांबवा सृष्टीचा
नको करू तु मानवा
जंगलतोड ,वृक्ष कटाई
हीच आहे खरी आपली संपत्ती
सगळीकडे पसरवू हिरवाई
पर्यावरणाच्या घटकांचे
सर्व मिळून करूया संवर्धन
सगळीकडे सर्व मिळून करू
एकच नारा वृक्षरोपण
पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा
हीच म्हण आता ठरेल खरी
प्रत्येकाने वृक्ष लावा
किमान एक तरी
पर्यावरण आहे आपल्या
जीवनातील अनमोल ठेवा
झाडे लावा, झाडे जगवा
प्रत्येकाने आपले कर्तव्य बजवा.
