पर्यावरण आणि निसर्ग
पर्यावरण आणि निसर्ग
होता मज निसर्गाशी जिव्हाळा
येता ऋतू उन्हाळा पावसाळा, हिवाळा
मानवा तू आलास मागाहून
तूज हि मी दिले भरभरून
अन्न, वस्त्र सुखद निवारा
उन, सावली पाऊस धारा
वाढला जसा तुझा वावर
जाहल्या तुझ्या मनिषा अनावर
विकासाची मारता मजल
केलीस तू झाडांची कत्तल
उखडून धरतीवरचे सुंदर गालिचे
फुलले मनोरे उंच इमारतींचे
नद्या, सागर कोंडून सारे
वाहती जेव्हा विकासाचे वारे
राने, वने, जंगल खचले सारे
चालवून कुर्हाड अन आरे
आधुनिकतेचा झाला डोलारा
उभारून गगनचुंबी मनोरा
न सोडले तू आकाश, अवकाश
धावतो आहे तू निराधार
ग्लोबल वार्मिंग, सिमेंट, रेती
लावलीस तू हिच शेती
जेथे तेथे हेच चित्र
न राहीलास तू निसर्ग मित्र
आता तरी.......
तुझी जागो सजगता
पर्यावरणाशी घे सहमिता
मांडू नको रे स्वत:चे सरण
सांभाळ मानवा पर्यावरण
चला पुन्हा झाडे लावा
वनराई अन बगिचे फुलवा
हिरवाईचे पट्टे सजवा
त्यातच तुमची वाट बनवा
कुणी सांगावे कसे भविष्य
पुढील पिढीचे तरेल विश्व
