प्रति ईश्वरासम..
प्रति ईश्वरासम..
1 min
175
प्रति ईश्वरासम प्रियकर जेंव्हा भासे।
प्रेमानुराग खराखुरा तिथे तेंव्हाच वसे॥
हृदयतारा एक होऊनिया झणकारती।
जाणावी तिथेच अहो प्रेमाची वस्तूंचे
चित्तातील स्पंदन जे अनुभवही एकरुप।
समजावे उमगले त्यांसि प्रेमाचे स्वरूप॥
हव्यास सोडून त्याग भावना दृढ होई।
तोच ख-या प्रीतीचे गुढ उकलूनी जाई॥
प्रेमस्मृतीत विरहही जेंव्हा होई सुसह्य।
त्यांनाच आकळले ख-या प्रेमाचे गुह्य॥
असेच प्रेमपुराण जे सदा आळवती।
सर्व स्पंदन तयांची ईश्वरचरणी जडती॥
