पृथ्वी आंघोळ करी
पृथ्वी आंघोळ करी
1 min
233
आभाळाने सूर्य झाकीला
कसा काळोखा दिसतसे
सरसरणाऱ्या धारामधूनी
पृथ्वी आंघोळ करी तसे
चमचमणाऱ्या विजामधूनी
किती गर्जना होत असे
या जलधारा पाऊस वारा
कसा थंड तो भास तसे
कुरणावरच्या झाडारती
थेंब जसा तो मोती असे
हिरवळ पाने तेज तवाने
मना मोहुनी घेत असे
दडुन पक्षी उडुनी दिसले
चरावया कसे जात असे
आनंदाने खुल्या मनाने
निज बाळासह रम्य असे
राना मधल्या हिरवळ झाकी
मना मोहुनी घेत असे
पाण्यासंगे मोद बहरतो
पक्षी गीत गात फिरे
राना मधल्या झाडावरती
रंगबिरंगी फुल खिले
आभाळाची चाहुल येता
मोर पिसारा फुलवित असे
माळावरती हिरवळ झाकी
गाई वासरे चरीत असे
शेतकरी मन प्रफुल झाला
मशागती तो करीत असे
नव पावसाचं स्वागत
पृथ्वी आंघोळ करी
