STORYMIRROR

Sarika Patil

Others

3  

Sarika Patil

Others

प्रेमा तुझा रंग कसा?

प्रेमा तुझा रंग कसा?

1 min
181

काळजाची गं सतार

अशी व्हावी वरखाली,

चिंब भिजाव्यात माझ्या

दोन पापणी पखाली॥१॥


धडधड का वाढावी

जाणताच स्पंदनाला,

जसा पाझर फुटावा

भरलेल्या रांजणाला॥२॥


गोड हितगुज व्हावे

बोल बोलूनी अबोल,

व्हावे आतुर काळीज

परी सांभाळून तोल॥३॥


द्यावं आयुष्य आंदण

कुणासाठी ओवाळून,

नाव नात्याचं वेगळं

प्रेम सर्वव्यापी धुन॥४॥


कधी माय बाप होई

कधी पति नि साजन

आजी आजोबांची माया

निळ्या आभाळी झाकण॥५॥


प्रेमा रंग तुझा कसा?

पाणी नितळ निर्मळ,

घेई सामावून सारे

भले असो अमंगळ॥६॥



Rate this content
Log in