प्रेम कर भिल्लावानी
प्रेम कर भिल्लावानी
1 min
335
प्रीतीच्या पाखरा;
घे श्वास मोकळा,
का झुरतेस मनातल्या मनी...
सजने ग प्रेम कर भिल्लावानी.
कशाला करतेस दिलाला बेजार,
ऐक जरा माझं जाऊ चांदण्यापार.
उगाच मनाला होतोय त्रास,
सखे तुझेच ग रूप मनात.
होशील का ग माझी राणी...
गातोय तुझ्यासाठी मंजूळ गाणी.
का झुरतेस मनातल्या मनी...
सजने ग प्रेम कर भिल्लावानी.
माझ्या प्रीतीचा कर स्वीकार,
खुलत जाईल प्रीती फार.
मनात माझ्या गोंधळ झाला,
प्रेमाला आपल्या साकार कराया.
का झुरतेस मनातल्या मनी...
सजने ग प्रेम कर भिल्लावानी.
हर्षित होऊन दोघं नाचू,
आपलच आपण भविष्य लिहू.
का अबोला वाहतेस मनी...
सजने ग प्रेम कर भिल्लावानी.
