प्रेम केले मी..
प्रेम केले मी..
प्रेम केले मी गुलाबावर, काट्यांच्या अडथळ्यांचेपण केले स्वागत,
उडी घेतली बिंधास्तपणे चिखलात आणि कमळ फुलले हृदयात.
प्रेम केले मी गुरुवर, तन मनाने केले मी सेवा,
अज्ञान्याच्या बेड्या सुटल्या, अहंकाराची काढून टाकली हवा.
प्रेम केले मी निसर्गावर, काळ्या ढगात लपल्या अमृताच्या धारा,
जात पात रंग भाषेचे भेद विसरून सर्वाना भेटतो वारा.
प्रेम केले मी चंदनावर, समजली संघर्षाची गाथा,
डगढावर झीझुन सुगंधी लेप होउन शोभवितो माथा
प्रेम केले मी आईवर अथांग तिचा मायेचा सागर,
कष्टाचे ओझे हास्य ओटावर, उभारला सौंसाराचा डोंगर.
प्रेम केले मी बाबांवर, तप केले अहोरात्र झिझून,
श्रमाचे अमृत पाझले मुलांना सागर मंथन करून.
प्रेम केले मी सूर्यावर, अविरत करतो जगाचे पालन पोषण,
चंद्र खुणवून करवितो प्रेयसीची आठवण.
प्रेम करा तुम्ही माणसावर, गरिबी श्रीमंतीचे मापदंड विसरा,
सगुण अवगुण विसरून माणसातल्या माणसाला स्वीकारा.
प्रेम करून बघा स्वतःवर, अंतरात्म्याची ज्योत पेटणार,
कणाकणात निसर्गाच्या चैतन्याचा आपोआप होणार साक्षात्कार...
