प्रार्थना
प्रार्थना
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
372
हे ईश्वरा,
दया कर ना आता
माफ कर ना आता
कोरोनाने आणलाय वीट
घेतलेत किती निरागस जीव
आम्ही शरण आलो तुला
हे क्षमादायका,
तुझीच आम्ही लेकरं
जोडतो आम्ही कर
क्षमेचे दे आम्हा दान
लावू नयनी सदा तुझे ध्यान
हे करुणा करा,
कोपू नको आम्हावरी
अपराध आमचे घाल उदरी
दयेने ऐक आता प्रार्थना
दाखवं तुझी आता करुणा
हे विधाता
तुझीच आहे ही सृष्टी
फिरव जरा आता तू दृष्टी
फिरवून तुझे सुदर्शन चक्र
सम्पव हा कोरोना दृष्ट