Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

sneha shinde

Others

3.5  

sneha shinde

Others

फुलबाग

फुलबाग

1 min
11.3K


प्राजक्ताच्या फुलांनी घातलाय दारी सडा

सोनचाफ्याचा गंध लेवून वाहतोय बेभान वारा


दवबिंदूंच्या थेंबांनी गुलाब असा नटला 

प्रातःकाळी हवेत मखमली गारवा दाटला


जास्वंदीसंगे सोनटक्क्याची जमलीय छान गट्टी  

मोगऱ्यासवे अबोलीही झालीय फार हट्टी


सदाफुली अन सायंकाळी झुळूकीसरशी डोले

कमानीवरचे कृष्णकमळ वेलींसंगे झुले

 

फांदीवरती गोकर्णाची शोभून दिसे नक्षी

गुलमोहराच्या वृक्षावरती किलबिल करती पक्षी 


जाई जुई अन शेवंतीचा शोभे हा ताटवा

हिरव्यागार पानांआड घाणेरीचा दाटवा 


केवड्यासोबत भुईचाफ्याचा दरवळे गंध

अंगणातली तुळसदेखील सुगंधात धुंद


नखशिखांत चिंब करी कुंदाचा सुगंध

मन मोहुन टाकी नखरेल गुलाबांचे रंग


चमेलीसंगे मधुमालतीची वाढलीय शोभा 

दारापुढचा गुलमोहर खुणावतोय नभा


रंगीबेरंगी फुलांनी गंधाळला आसमंत सारा

रातराणीच्या सुगंधाने धुंदावला बटमोगरा


Rate this content
Log in

More marathi poem from sneha shinde