फळा
फळा
1 min
301
मित्रांनो मी आहे फळा,
माझ्यासमोर असतो गोपाळा चा मेळा.
गिरवली जातात माझ्यावर सुंदर - सुंदर अक्षरे,
मन भारावून जाते जेंव्हा दिसतात चेहरे हसरे.
आता नाही फक्त मी काळा,
पांढऱ्या रंगामध्ये दिसतो मी निराळा.
मुलांच्या कोमल स्पर्शाने मी होतो हर्षित,
त्यांच्या ज्ञानाग्रहण कार्याने मी होतो प्रेरित
वाईट वाटते फक्त एका गोष्टीचे
वाईट वाटते फक्त एका गोष्टीचे,
वाढते तंत्रज्ञान हे जणू हाहाकार
यामुळे माझ्या जीवनात झाला अंधकार, अंधकार.
