पडद्यामागचा बाप
पडद्यामागचा बाप
1 min
230
बाबा घरातील कर्ता पुरुष
जवाबदारीचे ओझे सांभाळणारा
काष्टशिवाय त्याला पर्याय नसतो
घरावरील संकटे थांबवायला
राब राब राबतो
बाबा आपल्या सुखासाठी
ढाल बनून उभा राहतो
अडचणींवर मात करण्यासाठी
झिजलेली चप्पल अन
फाटलेला सदरा
मुलांच्या उच्च शिक्षणासाठी
तो दिन रात झिजला
तरीदेखील जास्त माया
आईलाच मिळते
कठोर मन , कराडी नजरेने
बापांच्या अंतःकरणाची घालमेल
मात्र कोणालाही दिसत नसते
असा हा पडयामागील बाप
घराचा पाया असतो
तरीही त्याच्या मेहनतीची किंमत
जगाला दिसत नसते
