STORYMIRROR

Shruti Diwadkar

Others

3  

Shruti Diwadkar

Others

छंद लागे कवितेचा

छंद लागे कवितेचा

1 min
185

लागे कवितेची गोडी 

जसे डंभ डोहाळ्याचा 

शब्द , वाक्य गुंफुनी ते 

जन्म होई कवितेचा ॥१॥


व्यक्त होतात भावना 

काव्यामध्ये त्या गुंफुन

लयबद्ध स्वरांमध्ये 

छान यमक जुळून ॥२॥


जन्म घेऊन कविता 

कविमन उलघडे 

सुख दुःख मनातील 

तिच्या मधून ते फुले ॥३॥


कल्पनेच्या विश्वामध्ये 

कधी कविता सजते 

कधी निसर्ग वर्णन 

काव्यातून उमलते ॥४॥


छंद मला कवितेचा 

कधी न व्हावा तो बंद 

होते मीच त्यात दंग 

मिळे मज तो आनंद ॥५॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन