पैशाचं झाड
पैशाचं झाड
1 min
413
माझ्या बालपणी
नेहमी स्वप्न पडायचं
पैशाचं झाड
आमच्या दारात दिसायचं
चार आण्याला मिळायचे
चार गुलाबजाम
अन् दहा पैसे दिले बाबांनी
की आनंद व्हायचा जाम
लेमनच्या गोळ्यांची तर
मजाच भारी
अन् पाच पैशाला मिळायची
बिस्किटे खारी
चुलीवर भाकरी दिसायची
आभाळातला चाँद
अन धडप्यात बांधून
शाळेत न्यायला
गम्मत भारी वाटायची
बालपणीचे ते दिवस
आठवतात जेव्हा
कळत नकळत
पाणी नयनी दाटून
येते तेव्हा
