पावसाळा (विडंबन)
पावसाळा (विडंबन)
1 min
225
मिटे उन्हाच्या झळ्या, झाले काळेभोर नभात
चारी दिशात आला एक पाऊस जोरात
सृष्टी निघाली न्हाऊन सारी, रम्य निसर्ग झाला
पडता पाऊस धरेवरी, संगे गारवारा आला
एक लोभस देणगी, लाभे सृष्टीस सृष्टीस
जल पिऊन तृप्त झाल्या, सजीवांच्या जाती
शब्द भारी उमगले, सजल्या काव्याच्या ओळी
पदोपदी मनी आता आनंदी आनंद.
कसा आजचा पाऊस, मात कालच्या दुष्काळावर
भेगाळलेल्या भुईला मायेचं आंदण
कसे अजब वाटे सारे आज मोहक मोहक
