पाऊस
पाऊस
1 min
222
वाऱ्यावरती स्वार होउनी
आली ढगांची ही स्वारी,
विजेचा हा लपंडाव
सोबत मेघगर्जना करी!...
धरणे ही आसुसलेली
वाट पाहते पावसाची,
मृदगंध हा दरवळला
जादू कोसळत्या सरींची!....
बळीराजा सुखावला
रोपे लागली डोलायला,
साचलेल्या तळ्यामध्ये
मुले लागली नाचाया!....
नका छेडू निसर्गाला
राखा पर्यावरणाचा समतोल,
भय न राही दुष्काळाचे
"पाऊस" , भेट आहे अनमोल!
