पाऊस
पाऊस
1 min
193
पाऊस धो धो कोसळला
नदीनाला दुधाळ फेसाळला
धरणी माय भुकावली
मृग धारात सुखावली
निळ्या नभा खाली
सुसाटवार धिंगाणा घाली
वनराई सृष्टी भिजते
आमराई हिरवीगार सजते
चौफेर ओला सुगंध
धुंद चैतन्य भुगंध
अवघीं अवनी न्हाली
वृक्षवल्ली ओलीचिंब झाली
बळीराजा राबतो राणात
आनंदी आनंद मनात
बैलगाडी घुंगराचा नाद
निसर्गाला घालतो साद
काळया आईचे चाकर
खोपीत कांदा भाकर
माऊलीची लगबग झाली
गुराढोरांना वैरण आलीं
पाटात झुळझुळ पाणी
कोकिळ गातो गाणी
गोठ्यात हंबरती गाय
चारापाणी करती माय
तरारून पीक आलं
शेतकऱ्यांचं सोनं झालं
