STORYMIRROR

Viraj Patil

Others

3  

Viraj Patil

Others

पाऊस परतीचाll

पाऊस परतीचाll

1 min
613

सकाळी जाणवतो मंद गारवा,

दुपारी तेवढच ऊन।

संध्याकाळी अकस्मात झर पावसाची,

त्यात व्याकुळ हृदय जाई भिजून।


ऊन, वारा, पाऊस असा हा खेळ करण्यात काय असतो निसर्गाचा तर्क?

सहज आज हा प्रश्न आला मनात,

म्हणून उत्तर शोधण्यात झालो गर्क।


मेट्रो मध्ये करत होतो प्रवास,

डोक्यात विचार होते खूप काही।

डी.एन.नगर ते घाटकोपर,

तरी उत्तर काही सापडलं नाही।


तितक्यात गडगडला एक ढग,मला म्हणाला,

नसते विचार कश्याला, तू तुझं काम कर।

मी म्हणालो, भडकण्यापेक्षा उत्तर दे,

बोल तू येतोस खाली कि मी येऊ वर?


मी का म्हणून तुझ्या प्रसनांची देऊ उत्तरं?

ओळख काय तुझी, काय तुझं नाव गाव?

सर्वात विकसीत असा मनुष्य प्राणी तू,

जरा तरी स्वतःची अक्कल लाव।


म्हणाला माणूस म्हणून विचार करशील,

तर अश्या प्रश्नांचा नाही लागणार छडा।

निस्वार्थ ह्या निसर्गाप्रमाणे विचार कर,

मग कोडी सुटतील धडा धडा।


तुम्हा लोकांना तर असतेच सवय,

दुसऱ्याचं ऐकून ठरवता अमानुष।

एकदा ही त्यातील तथ्य न जाणता,सोडून देता,

मग ती परिस्तिथी असो वा माणूस।


तुला पडलेला हा प्रश्न एवढ्या सगळ्यांमधून नेमका तुलाच का पडलाय,

ठाऊक आहे मला तुझ्या ह्या कठोर मुखवट्यामागे एक भावुक व्यक्ती दडलाय।


खूप साम्य आहे तुझ्या ह्या वागण्यात,

आणि ह्या खेळात निसर्गाच्या।

निसर्ग अडकलाय बदलणाऱ्या ऋतूंच्या चकाट्यात,

आणि तू कोरड्या सागरात प्रेमाच्या।


पावसाला आहे कल्पना की नंतर पुन्हा, आयुष्यात त्याला आतुरतेने भेटेल ही धरती।

तिला विश्वास आहे की पाऊस हा शेवटी माझाच आहे,

जरी आधी बरसला असेल कोणाहीवर्ती।


तर वर्षा ऋतू संपत आल्यावर,

जेव्हा पाऊस घेतो निरोप धर्तीचा।

त्या निरोपातून निर्माण होतो हा खेळ,

ह्यालाच म्हणतात पाऊस परतीचा


Rate this content
Log in