पाऊलवाट
पाऊलवाट
1 min
113
आयुष्याच्या वाटेवरती
चढ उतार हे ठरले आहेत
वाळणांची मज भीती नाही,
एकाकीपण छळते आहे
'सोबत आहे' सांगून
साथ देणारे निघून गेले
उपेक्षांचे वळ मात्र
मनावर सारे उठवून गेले
फसवे उसासे नुसते
सभोवताली होते
सुखाचे रुपडे ते सोनेरी,
ते ही सारेच फसवे होते
जुनी झाली असावे आता,
नवी उमेद कशी मिळावी?
वठलेल्या मनास,
नवीन पालवी कशी फुटावी?
मौनातले शब्द,
कुणासंही कळतं नाही,
मन व्हावे मोकळे अशी,
अजिबात अपेक्षा नाही
पण, विचारांची अडगळ,
सारी दूर करायची आहे
नागमोडी पाऊलवाट
पुन्हा नव्याने चालायची आहे
