पाच खोलीमित्र
पाच खोलीमित्र
माझे खोलीमित्र भारच खोड
पन आमची मैत्री गुडापेक्षा गोड
पहल्याची अवस्था खुप वाइट
सफाई मधे असतो तो एकदम टाइट
मागे त्याच्या नेहमीच असते खाज
हस्ताक्षरकलेचा नाही त्याला माज
खोलीच्या आमचा आहे हा लेखापाल
सागळ्यांसाठी जेवणाचा आनतो माल
याच्या निर्णयाचा कोणी करत नाही तोड़
कारण आमची मैत्री गुडापेक्षा गोड
दुसऱ्याचा वजन जणू काही देवमासा
काम त्याला फक्त सगळी भांडी घासा
वेब मालिकांवर तो खुप मरतो
रविवारी गरिबांसाठी सरळ हात करतो
आवडत नाही त्याला कोणताही भाजीपाला
आलु आणि वडा पाव ह्याला खाऊ घाला
डोक्यावरच्या केसांची चिंता तु सोड
कारण आमची मैत्री गुडापेक्षा गोड
तिसाऱ्याच्या स्केच कलेला पर्यायच नाही
प्रेमात हा सौदंर्य नाही बघत काही
अर्ध्या रात्री झोपेत मारतो हा मंत्र
दररोज व्यायाम हा त्याचा सेहतीचा तंत्र
अभ्यासात हा आहे भारच उत्कृष्ट
वरन बनवले की होतो हा संतुष्ट
कडु काळल्याची याला आवडत नाही फोड़
कारण आमची मैत्री गुडापेक्षा गोड
चौथा आहे आईचा लाड़का नंदन
संध्याच्या प्रहरला करी जननी ला वंदन
वरन भात जाडण्यात याचा पहिला नम्बर
भाजिपाल्यांचा शेतीच्या आहे हा मेम्बर
जरी असला त्याचा एक हात गंभीर
लढाईत पाऊल त्याचे नसतात स्थीर
मोबाइलवर तिच्यासोबत रात्रभर बोलणे सोड
कारण आमची मैत्री गुडापेक्षा गोड
पाचवा मी आहे शांत मला नाही काही ताण
मित्रांसाठी सतत आपले हजर असते प्राण
सकाळी लवकर उठण्याचा लय कंटाळा येतो
प्रत्येक महिन्याला खोलिभाड़ा मीच भरून घेतो
मस्करी करण्याची इथं सगड्यांना सुट
संकटात आम्ही आहोत सगळे एकजुट
सगड्यांसोबत आहे माझ अटूट जोड़
कारण आमची मैत्री गुडापेक्षा गोड
