ओळखून दाखवा माझी जात
ओळखून दाखवा माझी जात
1 min
382
मला नाही कळाली माझी जात
अनाथ मी कष्ट करून मी खात
मी रोज आनंदाने फिरतो मजेत
मी घातले रंगीबेरंगी कपडे
मला हिनवे या जातीचा त्या जातीचा
मलाही माझी जात नाही घावली
मी गाई सर्व महापुरुषांचे गीत
अंतरात येई नवचेतनाचे मीत
गीतावरून तो आपल्या जातीचा म्हणून येई जवळ
आपुलकीने मज बोले सगळे जण
मला नाही गवसली गीत गाताना माझी जात
माझ्या घरात सर्व महापुरुषांचे चित्र
मी सर्व महापुरुषांच्या विचारांचा मित्र
मी महापुरुषांचे विचार बोले तव्ह म्हणे हा आपला
बाकी हळू हळू जाई दूर
आपण मानव हे कधी नाही कळलं मानवास
