ओळख तुझी माझी
ओळख तुझी माझी




आता विधिलिखित म्हणावं की योगायोग...
दुर्दैवाने झालीच की,
ओळख तुझी नि माझी.....
जराशी फसवी, थोडीशी बनवाबनवी
आणि कधीही न संपणारी,
ती जीवघेणी रुसवारुसवी...
कधी कधी वाटतं,
का आलास तू माझ्या राशीला!
साथी म्हणून भेटलास.
की, कारण माझ्या छळाला....?
तुला तरी वाटतं का..,
तू फार गोड आहेस..!
साखरेच्या पाकातलं,
कडवट तू कारलं आहेस.
तुझ्यासाठी माझे
दिवसही अपुरे...,
तुझ्या लफड्यांत राहतात,
स्वप्न माझे अधुरे.....!
दूर गेल्यावरही,
आठवेल ना रे मी तुला..!
ती मिळाल्यावर,
विसरणार नाहीस ना या नकटीला.....?