ओढ पावसाची
ओढ पावसाची
1 min
12
नजर चिंतेची
रोख आभाळाकडे
पाहता भेगा रानाच्या
लागली ओढ पावसाची
साल दुःखाचे
दुष्काळ अन् अपेष्टांकडे
मातेरे आयुष्याचे
लागली ओढ हिरवाईची
कोडे विषण्णतेचे
पिडीत ही सारीकडे
वेदना मिटविण्या मनाच्या
लागली ओढ आल्हादाची
वेध ढगांचे
येतील तुषार सडे
सोनेरी आयुष्याच्या
लागली ओढ निर्मितीची