STORYMIRROR

DrKalpana Waghamare

Others

3  

DrKalpana Waghamare

Others

ओढ पावसाची

ओढ पावसाची

1 min
57

चातक कसा आतुरलेला

प्रतीक्षा काही संपेना

मेघाच्या वर्षावाविना

तृष्णा त्याची मिटेना


बळीराजा थकून गेला 

हरून बसला आशा

वाट बघता डोळे चिंबले

हाती केवळ निराशा


पावसा सारी सृष्टी

तुजविण रंगहीन

पशु-पक्षी बाग-बगीचे

जाहले कसे क्षीण


फुलांनाही बहरू दे

न्हाऊन निघू दे वृक्षांना

गार धारा बरसू दे आता

नभात दाटलेल्या मेघांना


तप्त झाली धरणी आई

अधीरता तृप्त होण्याची

तुझ्यातच रे क्षमता

प्रभाकराला विसावण्याची


अंत बघू नको रे आता

वेळ आली धीर सारण्याची

सुखांचा वर्षाव होऊ दे आता

साऱ्यांनाच ओढ पावसाची...


Rate this content
Log in

More marathi poem from DrKalpana Waghamare