STORYMIRROR

Ishwar Trimbak Agam

Others

3  

Ishwar Trimbak Agam

Others

ओढ पावसाची...

ओढ पावसाची...

1 min
54

श्रावणातल्या पावसात...

प्रियकराला त्याच्या प्रेयसीची,

तिच्या धुंद निकोप प्रेमाची,

कधी रिमझिम तर कधी मुसळधार बरसणारी,

ओढ पावसाची...


शेतात खपणाऱ्या बळीराजाला...

त्याच्या पिकांना जीवदान देणारी,

त्याच्या पोराबाळांचं भविष्य घेऊन येणारी,

अपुरी स्वप्न, त्या चिल्ल्यापिल्ल्यांच्या डोळ्यांत पाहून सुखावण्यासाठी,,

त्याला ओढ पावसाची...


सह्याद्रीच्या गडकोटांना,

माणसांनी केलेली घाण धुवून काढण्यासाठी,

अमृतरुपी जलधारांनी त्यांना अभिषेक घालून पवित्र करण्यासाठी,

पडक्या तटबंद्या अन ढासळलेल्या बुरुजांना,

मावळ्यांच्या रक्तानं पावन झालेल्या मातीला भेटण्यासाठी,

त्याला ओढ पावसाची...


कधी उंच अभेद्य शिखरांना,

इतिहासाची साक्ष देणाऱ्या दगड धोंड्यांना,

शिवशंभुरूपी जलधारा बनून आलिंगन देण्यासाठी,

त्यांना ओढ पावसाची....


Rate this content
Log in

More marathi poem from Ishwar Trimbak Agam