ओढ पावसाची
ओढ पावसाची

1 min

59
भेगांना या भूमीच्या तहान पावसाची
करपलेल्या मातीला प्रतिक्षा पावसाच्या थेंबाची
मरगळलेल्या मनाला उभारी मृदगंधाची
रखरखीत टेकड्यांना ओढ हिरवाईने नटण्याची
आटलेल्या नद्यांना ओढ खळखळून वाहण्याची
दाटलेल्या जलदांना घाई बरसण्याची
किलबिलती पक्षी लगबग घरटे विणण्याची
करपलेल्या मनांना फुंकर पावसाची
ग्रीष्माळलेल्या सृष्टीला ओढ पावसाची
ओढ पावसाची !!