STORYMIRROR

Mayur Bhoir

Others

3  

Mayur Bhoir

Others

नवीन पर्व....नवी सुरूवात....

नवीन पर्व....नवी सुरूवात....

1 min
292

तीच सकाळ तोच सूर्य 

पण कधी असा उगवतो 

आपल्या कर्तबगारीचे, कर्तृत्वाचे 

चलचित्र डोळ्यांपुढे सजवतो..


केले खूप जे करायचे होते 

आता परिवर्तनाची घटिका आली 

स्वतःसाठी जगावे,मनाला भावेल ते करावे 

आता सेवानिवृत्ती स्विकारली..


जरा विसावू या वळणावर

पूरवू हौस जी उणी राहिली 

छंद,व्यासंग,भ्रमंती,निश्चिंत..पण 

आता न होणे पराधीन सावली

आता सेवानिवृत्ती स्विकारली..


सोपं नसतं कैक वर्ष ट्रेनला लटकणं 

झपझप पावलांनी मस्टर गाठणं

साखरझोप न घेता,

तिने चहात साखर घालणं

अन्नपूर्णेनेही शिफ्ट्स आणि घर सांभाळणं..


सन्मार्गी लागली मुले

संसार झाला मोठा

उत्तम आरोग्य लाभो

लाभो भरभराटीचा साठा..


Rate this content
Log in