नकळत सारे घडले
नकळत सारे घडले
1 min
446
आस तुझी मनाला
का वेड लावून गेली
तुला पाहता कशी
मी हरखून गेली
ना कळे कधी कशी
मनकळी फुल झाली
भृंगापरी गुज
सांगुन गेली
सुखाचे किनारे
न मागता मिळाले
तुझ्या साथीने जणु
मन पाखरू उडाले
ओढ अतृप्त मनाची
ओढावते या जिवाला
अतुट बंध रेशमाचे
जुळुन आले त्या क्षणाला
ना भेट आधीची
ना कधी काळची
तरीही वाटे जणू
ही जन्मांतरीची
दोन मनांचे अनामिक नाते
असे अनोखे का प्रेम जडले
अजब हे गुढ की
नकळत सारे घडले
