STORYMIRROR

Shriram Patil

Others

3  

Shriram Patil

Others

"निंदा"

"निंदा"

1 min
175

आयुष्यात प्रत्येकाला गाठायच आहे ध्येय

सर्वजण करतायत मनापासून प्रयत्न

कधी येत अपयश, होते मग निराशा

म्हणून काय झालं, नाही सोडायची आशा

ध्येय प्राप्ती होत नसता, लोक मारतील टोमणे

पण म्हणून बदलायची नाहीत आपण आपली धोरणे

सकारात्मक विचारानेच परिस्थिती होईल निखळ

कुठूनतरी नक्कीच दिसेल आशेचा एक नवीन किरण

निंदा कुणाला चुकली, ती सर्वांनीच अनुभवली

पण काहींनी कधी घेतला नाही ताण

आठवणीत ठेवा सदैव यांचे जीवनगान

होवून गेले थोर संत, ज्ञानेश्वर अन् तुकाराम

होत असेल निंदा तर बांधा मनाशी एक खूणगाठ

आपण नक्कीच पकडली यशाची योग्य वाट

कुणी काहीही म्हणो, होवू नका जास्त विचारी

संतांनी लिहूनच ठेवलंय

निंदकाचे घर असावे शेजारी........

निंदकाचे घर असावे शेजारी .........


Rate this content
Log in