नगरसेवका
नगरसेवका
वार्ड तुझे रिकामे होत चालले ,
घरात कसा बसलास दडपून तू ,
निघ बाहेर नगरसेवका तू,
हो जागी ठेव जरा भान,
कर तू ऐलान देशील
जिवाशी जीव,
पाठीशी पाठ ,
कोरोना महामारीत ,
निवडणूक येताच क्षणी
पाय थारा देत नाही तुझा तुझ्या घरी ,
आज रे गरज तुझी मंग का थांबलास तू,
जिव चालला माझ्या रे मानवाचा
मग शांत का बसलास तू ,
कर काही मदत
माझ्या रे बांधवांचे नितांत हाल होतआहे.
कोरोना महामारीत ,
भुकेल्याला अन्न दे,
दे रोग्याला साथ
गरिबाला दे मायेचा हात ,
घरेच्या घरे पडले ओसं ,
कोरोना विळख्यात येत आहे रे लोक
कर तू प्रचार सांग घाबरू नको मानवा,
देईल मी साथ
कोरोना महामारीत,
मदतीचा हात घेऊन उत्तर रस्त्यावर
गरज आहे तुझी आता नितांत.
प्रश्न आहे आता जीवाचा
उंचव रे तुझे हात,
लाव तगादा काहीतरी वाचेल जीव
माझ्या बांधवाचे
कोरोना महामारीतून
