STORYMIRROR

Pallavi Bhushan

Others

3  

Pallavi Bhushan

Others

नात्यांची वीण

नात्यांची वीण

1 min
22

कधी कर्तव्य कधी हक्क 

कधी राग कधी सख्य

कधी गुपितं विश्वासानं

कधी पोकळ आश्वासनं


कधी सूर समजावणीचा 

कधी आवाज अधिकारवाणीचा

कधी शाबासकीची थाप पाठीवर

कधी शिक्षेची चपराक गालावर


कधी बाजी जीवाची

कधी लाखोळी शिव्यांची

कधी नातं मैत्रीचं

कधी नातं खात्रीचं


कधी गोड कधी कडू

कधी हसू कधी रडू 

मिश्र नात्यांची हि वीण

भाऊराया सांग कशी सोडू


Rate this content
Log in