Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shubham Kap

Others

3  

Shubham Kap

Others

नातं : बहिण -भावाचं...

नातं : बहिण -भावाचं...

1 min
141


भावा-बहिणीच्या नात्यामध्ये,

प्रेमाची असते गुंफन;

म्हणूनच तर हे नातं समाजात,

मानले जाते एक पवित्र बंधन.


बहिण ही आई-वडीलांकडे,

भाऊ हवा अशी मागणी करते;

भावाच्या जन्मानंतर ती,

तिचं आनंद व्यक्त करते.


लहानपणी खेळण्यांसाठी ती,

दोघेही एकमेकांशी भांडतात;

आईच्या सांगण्यावरुन मग,

दोघेही एकत्र खेळतात.


राखी-पौर्णिमेच्या दिवशी भाऊ,

बहिणीकडून राखी बांधून घेतो;

पुढील सार्‍या आयुष्यामध्ये,

बहिणीला संरक्षणाची हमी देतो.


वयाने असले जरी छोटे-मोठे,

तरी सुरुवातीला शाळेत सोबत जातात;

दुपारच्या वेळी मोठ्या सुट्टीत,

जेवण मात्र एकत्र करतात.


स्वतः मात्र आपल्या ताईला,

नेहमीच असतो रडवत;

दुसर्‍याने तिची खोड काढली,

तर नसे त्याला आवडत.


कितीही असला रुसवा-फुगवा,

तरी फार काळ टिकत नाही;

एकमेकांशी भांडल्याशिवाय,

त्यांनासुद्धा करमत नाही.


भाऊबीजेच्या दिवशी बहीण,

भावाची आतुरतेने वाट पाहते;

भावाला ओवाळून झाल्यानंतर,

मग घरच्यांचीही विचारपूस करते.


असं हे नातं भावा-बहिणीचं,

स्वर्गाहुन असते सुंदर;

म्हणूनच तर हे नातं,

जगात असते एक नंबर...


Rate this content
Log in