STORYMIRROR

Shravani Surve

Others

3  

Shravani Surve

Others

नाते ऋणानुबंधाचे...

नाते ऋणानुबंधाचे...

1 min
242

हिरव्या देठाशी पिकल्या पानाचे 

पहिल्या प्रेमाशी कोवळ्या मनाचे 

नाते ऋणानुबंधाचे...... 


वाहणाऱ्या नदीशी अथांग सागराचे 

लेखणीतील शाईशी कोऱ्या कागदाचे 

नाते ऋणानुबंधाचे...... 


उमलत्या फुलाशी मदहोश गंधाचे 

नात्यातील विश्वासाशी जोडलेल्या बंधाचे 

नाते ऋणानुबंधाचे...... 


उगवत्या सूर्याशी तांबड्या क्षितीजाचे

चंद्र ताऱ्यांशी रात्रीच्या आकाशाचे 

नाते ऋणानुबंधाचे...... 


स्वच्छंद हवेशी उडणाऱ्या पक्ष्याचे 

तुणीरातील बाणाशी भेदणाऱ्या लक्ष्याचे 

नाते ऋणानुबंधाचे...... 


छोट्याशा चिंगारीशी पेटणाऱ्या वणव्याचे 

किर्र अंधाराशी लुकलुकत्या काजव्याचे 

नाते ऋणानुबंधाचे...... 


कशा कशाशी कुणा कुणाचे 

ऋणा ऋणाशी ऋणा ऋणाचे 

नाते ऋणानुबंधाचे......


Rate this content
Log in