नाळ
नाळ
तू जन्माला आलीस आणि त्या doctor आज्जींनी नाळ विलग केली...
पण आपली गाठ घट्ट जमली.
एव्हढा छोटासा तो जीव...विश्र्वासच बसेना तू माझी आहेस,इतके दिवस पोटात बसलेलं पिल्लू हळूच कुशीत आल आणि आईला नुसत सैरभैर झालं. सगळं कसं नवीन ...काय करावं कळेना ...आईला तुझ्या काही काही सुधरेना ...
दिवसा मागून दिवस गेले..गट्टी जमली छान ...आईला पण होऊ लागलं सगळ्या गोष्टींच भान ...
दिवस गेले ,महिने गेले..तुझ्या बरोबर आई बाबा पण शिकू लागले बरच काही ..तुझ हसणं,तुझ रुसण,तुझ झरझर मोठ होणं...किती लळा लागला बाई...
निस्वार्थी प्रेम म्हणजे काय तुझ्याकडून कळले कोणी इतके कसे काय गोड मला मिळाले ..!
कितीही रागवा,कितीही ओरडा ...पिल्लू येत कवेत...घट्ट मिठीत सगळा राग विरून जातो हवेत...!
आपल्यावर कोणी इतकं कसं प्रेम करत? प्रश्न पडतो कधी कधी ...निसर्गावर आणि देवावर विश्वास बसतो तेव्हा आधी..!
चिमुकला जीव जेव्हा डोळ्या आड जातो...काही वेळ सुध्धा एक तप वाटून जातो...!
