मरण
मरण
1 min
256
प्रेमाच्या मोहक क्षणासाठी
नेहमी असायची मी अधीर...
आज उधळली स्तुती सुमने
पण देह होता माझा बधीर...
हौस माझी नेहमीचीच
आवडायचा खुप गजरा...
आज प्रेतावरी माझ्या
फुलला मोगरा हि हसरा...
आवडतात फुले म्हणुनी
देहावर माझ्या ओघळली आज जाई...
सुगंध तिचा ओळखीचा
पण नाकात माझ्या रुई...
आज मुक्तपणे सुखाने
जळत होते माझे सरण...
कैफ संपली श्वासांची
गोड झालं माझं मरण....
