मृगाचा पाऊस
मृगाचा पाऊस

1 min

148
आला मृगाचा पाऊस
फिटे धरतीची हौस..!
पक्षी गाती अशी गाणी
झाली चिंब झाडे रानी..!
पडतो पाऊस मोठा दूर
नदी-नाल्यांना येई पूर..!
सुखावला हा शेतकरी
त्याच्या मनाला उभारी..!
काळ्या आईची मोठी सेवा
वाडवडिलांचा हाच ठेवा..!
गोठ्यांत आनंदली गाई-गुरे
अंगणी भिजती मजेत वासरे..!
शेळ्या-मेंढ्या हिंडती माळांवरी
मुलांचे लक्ष आता शाळांवरी..!
संकट जाईल दूर पाण्यात वाहून
शिकू आता सारे अंतरात राहून..!