मृद्गंध पावसाचा!
मृद्गंध पावसाचा!
1 min
420
आसमंती दरवळे, चित्तास सुखवी परिमल
कोठून येतो गंध हा, वृत्तीच ज्याची निर्मल।
सुगंधी उत्साह हाचि रोमरोमी दाटतो
धरेच्या रंध्रात वसुनी, सृजन कार्य घडवितो।
रूप खुलवी सृष्टीचे, जादूगारच की जणू
चैतन्य वारा वाहतो, गंध किमया ही म्हणू।
बरसुनी गंधाळतो, थेंबांतूनी धारातुनी
चिंब वेड हिरवाईचे, मिरवितो गंधातुनी।
शृंगारुनी धरतीस, करतो मोह अत्तराचा
नभ -आस हळवी तृप्त करी, मृद्गंध पावसाचा।
