मृदगंध पावसाचा
मृदगंध पावसाचा
1 min
148
तहानलेल्या वसुंधरेला
आधार वर्षा ऋतूचा,
यांच्या मिलनानेच तर पसरतो
मृदगंध पावसाचा.
तृप्त व त्रस्त धरतीला
हवा असतो ओलावा प्रेमाचा,
वर्षाव होतो टपोरे थेंबाचा,
गंध पसरतो सुगंधी कस्तुरीचा.
पावसाच्या व जमिनीच्या प्रेमाचा
साक्षिदार आहे इंद्रधनुष्य,
विजांचा हि होतो कडकडाट
सुखावतो मनुष्य.
सुगंध पसरतो चोहीकडे
पडतो फुलांचा सडा,
मयुर नृत्याने पूर्ण भरतो
आनंदाचा घडा.
फळं फुलांनवर होतो
दवबिंदूचा शिडकाव,
नदी, नाले ओढे तुडुंब
वाहतात भरधाव.
डोंगर द-यांन वरून होतो
दुधाळ धबधब्यांचा मारा,
या हिरव्यागार ऋतुला
असतो काळ्या ढगांचा पहारा.
