मोगरा
मोगरा
1 min
11.6K
मनी हसला मोगरा
देउनी एक इशारा ,
जणु छेडीत सुंगंधीत
मनातील प्रेमळ तारा ,
मोहुनी मन क्षणात
जणु मी गंधीत जगात ,
हरवत गेले क्षणोक्षणी
भासे जादु की मी भ्रमात ,
दरवळता गंध अंतरीक्षि
सुखावला काळोख व रजनी ,
उजळता चंद्र बरसले तारे
भासे नक्षत्री रूप गगन सारे ,
किमया तुझी जगावेगळी
कायम सुंगंधीत तुझी झोळी ,
बांधिता घर तु शेजारी ए फुला
मनोमनी रेखील मी एक रांगोळी ....