जिव्हाऴा
जिव्हाऴा
1 min
2.9K
नकाे गं सखे त्याचा हात धरुस, आयुष्य नाही कुणाची वाट बघायला
सावध करते ऐक "नसेल ताे कायम, तुझी राखण करायला.."
मलाच नाही गं सखे ताे एकटेपणा भासेल,
भावनांच्या सरी तिकडेपण वाहत असेल,
जगाच्या या घाेळक्यात एकांत तिकडेपण हवाहवासा नसेन का?
पुरूषाला नकाे गं इतकं खंबीर समजू,
घरी परतायला तिकडेपण धडपड सुरूच असेल...
साेबत त्याची कायम असेल,
ताे नसूनसुद्धा सगळीकडे बहरेल,
संसाराचा लाेभ करुनी दूर, समजुनी बघ त्याच्या लाेकांसाठी
आसवे ओलांडतील उंबरठा, तुझ्या समजुतदार मनासाठी...
कधीतरी कुणासाठी, जगुनी बघ जरा आयुष्याचे गुढ, उलगडेल बघ आपाेआप...
