मन
मन
1 min
442
किती हळवं, नाजूक
जणू फुलातलं परागकण,
स्वतः झालासी दगड
आम्हा देऊनिया हे 'मन'
कशी सांगू देवा तुला
माझ्या प्रेमाची कथा,
कशी कळेल या दगडाला
माझ्या मनाची व्यथा
प्रेम आहे मृगजळ,
कळतंय या मनाला,
पण तूच नारे शिकवलं
या खेळात अडकायला
आता कसं करू शहाणं
या कोवळ्या मनाला,
अवघड तारेवर
समतोल राखायला
आता तूच ये समोरी अन्
समजवं या मनाला,
प्रेमच्याच पायी तर
तू दगडात ढाळलं स्वतःला
