मी कर्नाटकु विठ्ठलू
मी कर्नाटकु विठ्ठलू
1 min
170
सुन्या सुन्या गाभाऱ्यात माझ्या
मी राऊळी एकला उदास
जिथे तिथे होई मजला
तुम्हा भक्तांचाच भास
खिन्न जाहली ही चंद्रभागा
तिचा गहिवरला श्वास
रित्या रित्या वाळवंटा
काल्याच्या कीर्तनाची आस
ना टाळ मृदंगाची गोडी
गर्जे भीवरेच्या तीरी
भक्तीविना वैष्णवांच्या
बघ मौन झाली पंढरी
मी नाथ या पंढरीचा
रे लेकराविना अधुरा
होऊ नका दु:खीकष्टी
पळवू विषाणूस माघारा
विरहात मम भेटीच्या
नका नका अश्रू ढाळू
मी कर्नाटकु विठ्ठलु
गे हृदयी तव सर्वकाळू
