STORYMIRROR

Santosh Sonawane

Others

4  

Santosh Sonawane

Others

मी अंतर्मुख होतो तेव्हा...

मी अंतर्मुख होतो तेव्हा...

1 min
224

शरीराच्या गरजा भागवता भागवता

नकळत मनाचा विसर पडतो,

आणि मग आपले शरीर आणि सुविधा

अशा विचारातून गरजा भागवणं

यालाच जगण्याचा आणि जीवनाचा अर्थ समजू लागलो......

धावतोय धावतोय...... वाट काही संपत नाही

आणि शर्यत काही पुरी होत नाही

कधीतरी मनात पाल चुकचुकते

मनाच्या अंतरंगाची हाक ऐकायला हवी

इतकं आयुष्य जागून झाले

पण खरच जगणं होतेय का माझं......

जीवनाच्या सायंकाळी

नाईलाजानं मनुष्य

आपल्या आयुष्याचा हिशोब करतो

शरीराची आणि मनाची किती हेळसांड झाली

याची बेरीज-वजाबाकी मांडत बसतो........

अरे वेड्या! वेळ अजुनही सरली नाही

जगण्याची आशा तुझी

अजुन काही भरली नाही....

उघड डोळे, आणि

मनाच्या जगण्याला हाक दे

डोळे भरून मनाच्या जगण्याला दाद दे......


Rate this content
Log in