मी आणि आरसा
मी आणि आरसा
1 min
38
मी उभी राहिली पाहत पदरावरचे *मोर*
आणि थुई थुई नाचू लागले *मनमोर*
काय पाहतेस अशी तुझेच रुप *सुंदर*
त्याहून आहे सखी तुझे मन *सुंदर*
पुन्हा एकदा अलगद तुझ्यात पाहते *रुप*
कित्येक वर्षानंतर बदललेले *स्वरुप*
चंद्रहार लेवून सजलीस लावून अशी *चंद्रकोर*
बघून तुला लाजेल आता ती चंद्राची *कोर*
किती करशील कौतूक पाहून हा *चंद्रहार*
जीवनात मात्र सतत झाली माझीच *हार*
मग केला असा हा कशास आज *साज*
दु:खाच्या सप्तसुरांवर चढव आनंदी *स्वरसाज*
विसरले स्वर तेव्हाच ओलांडून येता *माप*
आता करु कशास सुखदु:खाचे *मोजमाप*
माझ्यात डोकावून दुःखास लाव *कातर* कातर
वेळेस नको करु असा स्वर *कातर*
हो! दर्पणा, ऐकते तुझं तूच माझा आता *सखा*
प्रतिबिंबात रमतेय हरवून माझा *जीवनसखा*