म्हणजे मग......
म्हणजे मग......

1 min

374
रुतलेला काटा तसाच राहू दयावा..
म्हणजे मग जखमान्ना कुरवळता येतं
आपल्या सवडीनुसार हव तेव्हा...
अस्तित्वाची झालर हवीच स्वपणांना
म्हणजे मग वेड्या मनाला भटकायला होत नाही..
प्रेमाला स्पर्शाची भाषा ठाऊक नसावी
म्हणजे मग कितीही लांब गेल तरीही ते टिकून राहत
कसल्याही अटींविना...
अश्रूना हवा तेव्हा हव तिथे वाट करून देता आली पाहिजे
म्हणजे मग मनाचा कोंडमारा होत नाही...
आकर्षण ते कुठंलही असो थोपवून धरता यायला हवं
म्हणजे मग पुढच्याला कायमचा आपल्या आकर्षणात बुडताना बघता येतं...
प्रत्येकाला फुलायला बहारायला एक जागा हवीच
म्हणजे मग मनाच्या गुलामोहाराला बहारायला जागा शोधावी लागत नाही...
मंदिराला पायऱ्या ह्या असाव्यातच
म्हणजे मग प्रत्येक पायरीगणिक तुम्ही विकार वहात जाता
आणि मूर्तिपुढे निर्वीकार उभे ठाकता....