महाराष्ट्र देशा
महाराष्ट्र देशा
1 min
212
भाग्यवान जाहलो आम्ही,
बोलतो, ऐकतो अन वागतो मराठी ।
विशाल असा महासागर लाभला,
गोदावरी, भीमा, कृष्णा,अन इंद्रायणी वाहती ।।
लाभले संत आम्हास ज्ञानदेव , चोखा,
गोरा कुंभार अन तुकारामा ।
आयुष्य वेचले त्यांनी,
दिली शिकवण मानवतेची आम्हा ।।
सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यातुन घुमला,
हर हर महादेव चा आवाज ।
सांडिले मावळ्यांनी रक्त,
उभे केले हिंदवी स्वराज्य ।।
कोकण अन पश्चिम मुलुख देती प्रेरणा,
मुंबई तर असे आमची शान ।
आशीर्वाद देती तुळजाभवानी मराठवाड्या,
उत्पन्न देती विदर्भातील खाण ।।
आभाळातून उठून दिसते,
हिरव्यागार सह्याद्रीच्या रेषा ।
जय जय जय जय
जय जय महाराष्ट्र देशा ।।
