मधूसिंधू काव्य- वाद्ये
मधूसिंधू काव्य- वाद्ये
1 min
399
टाळ, मृदुंग
वाजे भजनात
संत अभंगात
सारेच गुंग
वाजे तबला
ताल धरूनिया
गीत गाऊनिया
जीव रमला
शाहिरी बाणा
थाप डफावर
हो संबळावर
गोंधळी राणा
ढोलकी ताल
लावणीच्या संगे
फडावर रंगे
वाजता चाळ
सनई सूर
उत्साह वाढवी
मंगल घडवी
आनंदे ऊर
आरती वेळी
होई घंटानाद
छेडी भक्तीनाद
भक्तांच्या मेळी
